सोमवार, १८ जुलै, २०१६

एक बहिण आपल्या भावाला बोलते..
माझ्यासोबत (बलात्कार) अस काही झाल
तर....??
भावाने ऊत्तर दिले..
वेडी झालीस काय...?
मी अस्स काही होऊच देणार
नाही...
बहिण : अस्स झालच तर? ?
भाऊ: मी एक एकाचा जीव घेईन..
आणी त्या नराधमांना अस्स मारेन की
संपुर्ण
जग आठवण ठेवेल..
बहिण: दादा एक विचारु...???
भाऊ: हो बोल ना....
बहिण: ती तुझ्या
बहिणीसारखी नाही का
जिच्यासोबत बलात्कार होतो...???
भाऊ (मान खाली घालुन)
हो आहे ना बहिणीसारखी
पण
सख्खी तर नाही ना..?
बहिण: दादा तु अस्स कस बोलु शकतोस..?
ऊद्या माझ्यासोबत अस्स काही घडल तर सगळे
हाच विचार करतील तेव्हा तु एकटा काय
करशिल..?
भाऊ : मला माफ कर ताई...
मी जर असा विचार केला तर माझीच बहिण
धोक्यात राहील..
मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे
की..
आपल्या घराची इज्जत वाचवायची असेल
तर
दुसर्यांच्या बहिणींना पण
आपल्या बहिणी सारखी समजा...
नराधमांचा विरोध करा आणि पिडीत
मुलींचा महिलांचा साथ द्या...
"एखाद्या मुलीला item म्हणून बोलणे खूप सोपं असत ...
पण त्याच मुलीला ताई म्हणून
बोलण्यासाठी नुसतं मराठा किंवा नावापुढे शिवभक्त असून
चालत नाही ...
त्यासाठी सोबत समर्थांचे विचार आणि अंगात शिवबाचा_शिवअंश असावा लागतो.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा